देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते शुभेच्छा
मंडणगड (प्रतिनिधी)
देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील उत्साही, विद्यार्थीप्रिय आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व प्रा. अमित रसाळ सर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ता तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते प्रा. रसाळ सरांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा सातत्याने विचार करणारे तसेच शैक्षणिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहणारे प्रा. अमित रसाळ सर आपल्या प्रभावी व उत्साही सूत्रसंचालनासाठीही विशेष ओळखले जातात. विद्यार्थ्यांना प्रेरणा देत शाळा-महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी सकारात्मक योगदान देणाऱ्या त्यांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.
यावेळी प्राध्यापक कुंडलिक यादव, वैभव पाध्ये, योगेश कुमार केसरे, दत्तात्रय कदम, प्रशांत उगले आदी उपस्थित होते.
प्रा. अमित रसाळ सरांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यश आणि आनंद लाभो, तसेच त्यांच्या ज्ञान व अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना सदैव मिळत राहो, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.








