स्वामित्व योजना, शासकीय जमीन मोजणी व पाणंद रस्त्याच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी
मंडणगड (प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्याचे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सचिन इंगळे यांनी मंडणगड तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान देव्हारे येथे भेट देऊन भूमी अभिलेख विभागाच्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
या दौऱ्यात स्वामित्व योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पडताळणी, शासकीय जमिनीच्या मोजणीची तपासणी आणि पाणंद रस्त्याची पाहणी करण्यात आली. भूमी अभिलेख विभागाच्या स्थानिक स्तरावरील कामकाजाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून जमीन मोजणीच्या प्रक्रियेची तसेच सुरू असलेल्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती जाणून घेण्यात आली.
स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीसह शासकीय जमिनींची मोजणी आणि पाणंद रस्त्यांशी संबंधित कामांना या पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून महत्त्व प्राप्त झाले. प्रत्यक्ष स्थळावर जाऊन कामांची स्थिती जाणून घेतल्यामुळे संबंधित कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यास मदत झाली.
या पाहणी दौऱ्यावेळी मंडणगडचे उपअधीक्षक भूमी अभिलेख आनंद गवळी, मंडणगडचे सहाय्यक मुख्यालय प्रमुख दिलीप बोटे, भूकरमापक जालिंदर गलांडे, भूकरमापक विनोद कदम तसेच कर्मचारी नितीन रेवाळे उपस्थित होते.







