“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” अभियानांतर्गत शासन आपल्या दारी
तहसीलदार अर्चना बोंबे यांच्याकडून नियोजन
दापोली प्रतिनिधी
राज्य शासनाच्या “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या (VJNT) कल्याणासाठी दापोली तालुक्यात २७, २८ आणि २९ सप्टेंबर रोजी सलग तीन दिवस विशेष सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली शहरातील ‘ओम साईराम मित्र मंडळा’च्या सार्वजनिक गणेशोत्सवात जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे आयोजित लोकसंवाद २०२६ कार्यक्रमात दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी ही माहिती दिली.
या लोकसंवाद कार्यक्रमाला तहसीलदार कार्यालयाचे अव्वल कारकून बाळा कराड, मंडळाचे अध्यक्ष निलेश (बावा) केळसकर, पत्रकार प्रसाद रानडे, शिवाजी गोरे उपस्थित होते.
जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम दापोली येथे गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.
तहसीलदार बोंबे पुढे म्हणाल्या की, हे शिबिर तीन दिवस कलगत तीन ठिकाणी आयोजित करण्यात आल आहे दापोली तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालय वाकवली, पालगड येथे परमपुज्य साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालय पालगड तिठा, दाभोळ येथे ग्रामपंचायत कार्यालय दाभोळ या ठिकाणी सकाळी दहा ते चार वेळेत आयोजित करण्यात आल आहे. नवमतदार नोंदणी,शिधापत्रिका, जात, उत्पन्न, रहिवासी, अधिवास व नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्रे,आधार कार्ड सेवा,आयुषमान भारत कार्ड नोंदणी,विवाह व जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रे,श्रावणबाळ व संजय गांधी योजना,प्रधानमंत्री आवास योजना, अॅग्रीस्टॅक व फार्मर आयडी सेवा,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच दाभोळ येथील शिबिरात मत्स्य विभागाचे फिशरीज कार्ड व पीएम मत्स्य संपदा योजनेंतर्गत कर्ज योजना ही विशेष सुविधा मिळणार आहे. तहसील कार्यालय दापोली तसेच दापोली तालुक्यातील विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी शिबिरस्थळी उपस्थित राहून नागरिकांना सेवा उपलब्ध करून देणार आहेत. तरी वरील क्षेत्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांच्या ठिकाणी विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील बांधवांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहून विविध सेवा/दाखले प्रमाणपत्र यांचा लाभ घ्यावा असे आवाहन दापोली तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील सर्व बांधवांना केले आहे. गृह व महसूल राज्यमंत्री योगेश कदम तसेच जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार महसूल विभागाकडून मिळणाऱ्या विविध दाखले सुविधा यासाठी सेतू कार्यालयात सुविधा उपलब्ध आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा सेवा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दापोली तालुका तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली यावेळी दिली. नागरिकांना शासनाच्या विविध विभागातील योजना लाभ मिळण्यास समस्या आल्यास गाव पातळीवर नागरिक व प्रशासन यांच्यातील दुवा असलेले तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले. या जनसंवाद कार्यक्रमासाठी ओम साई राम मित्र मंडळाचे निखिल परब सेक्रेटरी बाळा पवार,स्वप्निल जोशी, प्रथमेश दुर्गावळे, भाऊ वेल्हाळ, तेजस घाणेकर, सानिका पवार, अर्चना शिगवण अधिकारी-कर्त्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.












