दापोली प्रतिनिधी
डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय दापोलीच्या कृषि विस्तार शिक्षण विभागातर्फे अनेक विस्तार शिक्षण उपक्रम राबविले जातात. या अनुषंगाने या वर्षी खरीप हंगामात दत्तक खेडे किन्हळ व दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना हळद बियाण्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.
सदर हळदीचे बियाणे हे कृषि वनशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय राणे यांचेकडून वनशास्त्र महाविद्यालयातील सिंधुरत्न समृध्दी योजनेअंतर्गत जास्तीत शेतकऱ्यांनी हळद लागवडीचे क्षेत्र वाढवणेच्या दृष्टीने मोफत पुरविण्यात आले होते. यावेळी विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मंदार पुरी, कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे, डॉ. शिल्पा नाईक, दृकश्राव्य चालक श्रीयश पवार, लिपीक अभिजीत उमराणे, वाहन चालक प्रवीण पवार आणि कृषि विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी सौ. दर्शना वरवडेकर आदि उपस्थित होते.
यावेळी गिम्हवणे येथील श्री. सचिन महादवे, उंबर्ले येथील रमेश टेमकर, हर्णे येथील अविनाश मळेकर, किन्हळ मधील श्री. सुरेश डायनाक, संदेश येसवारे, प्रशांत चिपटे, रोहिणी येसवारे, दिलीप येसवारे, श्रीकांत रेवाळे तसेच देवके येथील श्री. संजय गोरीवले, दत्ताराम आग्रे, संतोष गोरीवले आणि विलास गोरीवले या सर्व शेतकऱ्यांना एकूण ८८ किलो हळद बियाणे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता सहाय्यक प्राध्यापक डॉ. मंदार पुरी, कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे, डॉ. शिल्पा नाईक, दृकश्राव्य चालक श्रीयश पवार, लिपीक अभिजीत उमराणे, वाहन चालक प्रवीण पवार आणि कृषि विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी दर्शना वरवडेकर चंद्रकांत साळवी यांनी विशेष मेहनत घेतली.



