मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासी महिलांना अत्यल्प दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मंडणगड येथील श्रद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. नारायण कुलकर्णी यांनी अत्यंत कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी महिलांसाठी केवळ ₹२०० मध्ये सोनोग्राफी तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विशेषतः गर्भवती महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोनोग्राफी अत्यंत महत्त्वाची असते. ही बाब ओळखून डॉ. नारायण कुलकर्णी यांनी अत्यल्प दरात ही सेवा उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.त्यांच्या या कार्याची दखल भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांनी घेतली असून त्यांचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जनसेवा सप्ताह’अभियानांतर्गत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी च्या वतीने डॉ. नारायण कुलकर्णी व डॉ. श्रद्धा सावंत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मंगेश मोहिते म्हणाले की,डॉ.कुलकर्णी यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे मंडणगड तालुक्यासह परिसरातील आदिवासी महिलांना मोठा दिलासा मिळणार असून, वेळेवर निदान व उपचार होण्यास मदत होणार आहे. आरोग्यसेवेला सामाजिक सेवेची जोड देणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मंगेश मोहिते,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर,भाजपा चिपळूण तालुका अध्यक्ष उदय घाग,चिपळूण तालुका ग्रामीण पश्चिम महिला मोर्चा अध्यक्षा वैष्णवी राजेशिर्के,जिल्हा निमंत्रक समिती सदस्य गणपत गावकर,जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश घाग,दीपक गुरव,कृषि मित्र दीपक मोहिते सह पदाधिकारी उपस्थित होते.








