संजीवनी गटामार्फत शिवाजीनगर साखळी येथे येथे उपक्रम
दापोली तालुक्यातील शिवाजी नगर, साखळोली : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय दापोली येथील विद्यार्थीनींच्या संजीवनी गटामार्फत काळी मिरीच्या कटिंग निर्मितीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी निरोगी व रोग-किडींपासून मुक्त वेलींची निवड करून २ पेर कटिंग तयार करण्याची पद्धत शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आली.
कटिंगच्या खालच्या भागास तिरपा काप व वरच्या भागास सरळ काप देऊन खालची पाने काढण्यात आली. कटिंगचा तळाचा भाग कोरफडीच्या गरामध्ये बुडवून माती व शेणखताच्या मिश्रणाने भरलेल्या १५ × ५ सेंमी पॉलीबॅगमध्ये लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांनी स्वतः कटिंग तयार करून लागवडीचा सराव केला.
या प्रात्यक्षिकास १६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. प्रात्यक्षिकानंतर उपस्थित शेतकऱ्यांना तयार केलेल्या काळी मिरीच्या कटिंगचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना काळी मिरीची अभिवृद्धी व लागवडीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले असून काळी मिरी लागवडीस प्रोत्साहन मिळणार आहे.
कार्यक्रमास शेतकरी व RAWE अंतर्गत संजीवनी गटाच्या विद्यार्थीनी कृतिका ठाकरे, श्रावणी गिम्हवणेकर, कुंजल कांबळे, कृतिका खोडका , वैष्णवी अहिरे, अंजली देवकाते, सानिया खोत, स्वालिहा मुकादम , तेजोन्मयी बलवान, अक्षता कालप यांनी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले.
सदर कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ.महेश कुलकर्णी , कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.







