मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, गायिका वैशाली सामंत यांची उपस्थिती
रायगड रोहा
वरदा सुनिल तटकरे संगीत व नृत्य अकॅडमीच्या उद्घाटन सोहळा डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृह, #रोहा येथे संपन्न झाला.
रोहा व परिसरातील कला क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या या उपक्रमातून स्थानिक कलाकारांना संगीत व नृत्य क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांकडून प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील प्रतिभेला योग्य संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने ही अकॅडमी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.
यावेळी सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री, ख्यातनाम संबळवादक विजय चव्हाण आणि सुप्रसिद्ध ढोलकीवादक निलेश परब यांच्या विशेष उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. तसेच मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, वरदा सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात साजरा झाला.
या अकॅडमीतून अनेक गुणी कलाकार घडोत आणि रोह्याचे व रायगड जिल्ह्याचे नाव कला क्षेत्रात अधिक उज्ज्वल होवो हीच सदिच्छा असल्याचे गौरवोउद्गार खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केले









