नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करण्याचे आवाहन
मंडणगड(प्रतिनिधी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, भारतीय जनता पार्टी (भाजप) मंडणगड व अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्रद्धा हॉस्पिटल येथे करण्यात आले आहे. “रक्तदान हेच जीवनदान” या उदात्त भावनेतून आयोजित या शिबिरात सर्वांनी सहकार्य करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी सरचिटणीस अभिजीत देवळेकर व मंडणगड तालुका अध्यक्ष दत्ता महाडीक यांनी केले आहे.आपण दिलेले एक युनिट रक्त एखाद्या गरजू रुग्णाचे प्राण वाचवू शकते. हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी विधायक कार्य करण्यासाठी मंडणगड परिसरातील सर्व नागरिकांनी, विशेषतः तरुण वर्गाने मोठ्या संख्येने पुढे येत रक्तदान करावे.श्रध्दा हॉस्पिटल मंडणगड किंवा स्थानिक भाजप पदाधिकारी भाजपा सरचिटणीस ॲड सुशील दळवी,यश मेहता,शहर अध्यक्ष आनंद नारकर,महिला मोर्चा अध्यक्षा श्रेया दळवी यांच्याशी संपर्क साधून या शिबिरामध्ये आपली नोंदणी करावी. असे आवाहन करण्यात येत आहे.







