दापोलीचे प्रांताधिकारी विजय सूर्यवंशी व तहसीलदार अर्चना बोंबे यांची मोठी कामगिरी
दापोली विशेष प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रात मतदारांसाठी एस.आय.आर.प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेत अवघ्या महाराष्ट्रात 263 दापोली विधानसभा मतदारसंघ अव्वल स्थान राखले असून अवघ्या महाराष्ट्रात ही प्रक्रिया पूर्ण करणारा 263-दापोली विधानसभा मतदारसंघ हा राज्यात दुसरा ठरला आहे. दापोलीचे प्रांत अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी ही प्रक्रिया अतिशय उत्तमपणे राबवून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. ही प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण करण्यासाठी काहीसा दुर्गम भाग असलेल्या मंडणगड तालुक्यातही प्रक्रिया पूर्ण झाली असून मंडणगड तालुक्याचे मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे यांचेही दापोली प्रशासनाला उत्तम प्रकारे सहकार्य मिळाल आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे त्यांना ही प्रक्रिया पार पडत असताना यासाठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन करणे, तांत्रिक प्रक्रिया समजून सांगणे ही महत्त्वपूर्ण कामगिरी या दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. यासाठी दापोली, खेड, मंडणगड या तिन्ही तालुक्यातील कर्मचाऱ्यांनीही मोठी मेहनत घेतली आहे. 263 – दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोली खेड मंडणगड तालुक्यातील एकूण 392 मतदान केंद्र आहेत. तितकेच मतदान केंद्र स्तरीय अधिकारी BLO असून असून 2 लाख 90 हजार 447 इतके एकूण मतदार आहेत. सदर मतदार यांचे मुदतीत गणना पत्र म्हणजे enumeration form चे वाटप करणे आणि त्यांचे digitisation हे मुदतीत पूर्ण करून हे अत्यंत महत्वाची जबाबदारीची असलेली प्रक्रिया दापोली मतदारसंघात येणाऱ्या दापोली, खेड व मंडणगड या तीनही तालुक्यातील मतदारसंघात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याबद्दल 263- दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडूनही या अधिकाऱ्यांचे या प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आल आहे.








