रत्नागिरी/खेड
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष अॅड. वैभव खेडेकर, भाजपा खेड शहर, भाजपा युवा मोर्चा यांच्यावतीने भरणे नाका, खेड येथे भव्य स्वागत करण्यात आले. भाजपाचे युवा नेते खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी यांनी केलेल्या धडाकेबाज भव्य स्वागत कार्यक्रमामुळे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी खेड शहरातील व तालुक्यातील विविध विकास कामा संदर्भात चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा आमदार प्रमोद जठार, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा खेड शहर उपाध्यक्ष राहुल पाटणे, भाजपा खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, भाजपा महिला मोर्चा खेड उपशहर अध्यक्ष मिनल गुहागरकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल होळकर, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल होळकर, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष अविराज मोरे, भाजपा खेड शहर चिटणीस राकेश चव्हाण, मंदार आपटे, शशांक सिनकर, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष रूपेश तावडे, संभाजी देवकते, माजी नगरसेवक संदेश भुवड, सुयश उर्फ बॉबी खेडेकर, अनिल सनगरे, बाळु वर्मा, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, जयेश गुहागरकर, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.












