मंडणगड (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील स्मारकास भारतीय जनता पार्टी (भाजपा) अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीच्या वतीने भेट देऊन महामानवास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतून देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दिला. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजात सामाजिक समरसता व संविधानिक मूल्ये रुजविण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
तसेच त्यांच्या विचारांचा प्रसार करून मानवतेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचे प्रतिपादन भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मंगेश मोहिते यांनी केले.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मंगेश मोहिते, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर,भाजपा चिपळूण तालुका अध्यक्ष उदय घाग,चिपळूण तालुका ग्रामीण पश्चिम महिला मोर्चा अध्यक्षा वैष्णवी राजेशिर्के, जिल्हा निमंत्रक समिती सदस्य गणपत गावकर,जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश घाग,दीपक गुरव,कृषि मित्र दीपक मोहिते उपस्थित होते.








