चिपळूण
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील सावर्डे ग्रामपंचायत ढोक्रवली गावच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सौ. पूजा विजय मांडवकर यांची महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सत्काराच्या वेळी रत्नागिरी उत्तर अनुसुचित मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, जिल्हा निमत्रक समिती सदस्य गणपत गावकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा वैष्णवीताई राजेशिके, कृष्णा मोहिते, दीपक मोहिते, बुथ अध्यक्ष गणपत राणे उपस्थित होते. गणपत गावकर यांनी महिला सक्षमीकरण व महिलांचे अधिकार याबाबत माहिती दिली.








