मंगळागौर स्पर्धेत मैत्री ग्रुप प्रथम क्रमांकाचा मानकरी
झिम्मा क्वीन द्वितीय तर काळकाई देवी तृतीय
दापोली प्रतिनिधी
मंगळागौरीची संस्कृती परंपरा महिलांनी जपली आहे राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून कौतुकमंगळागौर स्पर्धेत मैत्री ग्रुप प्रथमझिम्मा क्वीन द्वितीय काळकाई देवी तृतीयदापोली प्रतिनिधीमहिलांनी मंगळागौरीची परंपरा जपली आहे हा वारसा जपला आहे हे पाहून आनंद होतो असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले. आज या स्पर्धेला आपली पत्नी श्रेया कदम हिच्यामुळे मला मुंबईतला कार्यक्रम रद्द करून या कार्यक्रमाला यावं लागल असं सांगत शिवसेना महिला आघाडी कडून आयोजित कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केल. शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली रसिकर रंजन नाट्य मंदिर येथे शिवसेना महिला आघाडीकडून आयोजित मंगळागौर स्पर्धेत ते बोलत होते.
कदम पुढे म्हणाले की, या स्पर्धेला मिळालेला महिलांचा प्रतिसाद पाहता आता आपली परंपरा संस्कृती जपणारी ही मंगळागौर स्पर्धा आता दरवर्षी भरवली जाईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली. शिवसेना महिला आघाडीकडून आयोजित मंगळागौर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला आघाडीच्या श्रेया कदम, नगराध्यक्ष कृपा घाग सभापती उन्मेश राजे, महिला आघाडीच्या दीप्ती निखार्गे, रोहिणी दळवी, चारुता कामतेकर, कीर्ती परांजपे, उपसभापती नम्रता तोडणकर, नगरसेविका शिवानी खानविलकर आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते उपस्थित होते.श्रावण महिन्यात कोकणात मंगळागौरींचे कार्यक्रम रंगले आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातील दापोली येथे झालेला मंगळागौर स्पर्धेत दापोली शहर परिसरातील मैत्री ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांकझिम्मा क्वीन तर तृतीय क्रमांक काळकाई देवी हे ग्रुप या मंगळागौर स्पर्धेचे मानकरी ठरले आहेत. यावेळी शिवसेना महिला आघाडीचे नेते श्रेया योगेश कदम यांनीही उपस्थित महिलांचे कौतुक करत पुढील वर्षी आपण याहीपेक्षा मोठा नवीन नाट्यगृहाच्या ए.सी. सभागृहात ही मंगळागौर स्पर्धा घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे रामदास भाई कदम योगेश दादा कदम यांच्या सहकार्याने दापोली नगरपंचायतीच्या नाट्यगृहासाठी 15 कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यामुळे आता आपल्याला लवकरच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नाट्यगृह मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी कार्यक्रमात सांगतात उपस्थित महिलांनीही या घोषणेचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
मंगळागौर पूजन व रात्री जागवली जाणारी मंगळागौर हा महिलांसाठी मोठा उत्साहाचा सण असतो. कोकणातील ग्रामीण भागात आजही श्रावण महिन्यात मंगळागौरी पूजन केले जाते. कोकणातील ही परंपरा असलेल्या मंगळागौर स्पर्धेचे आयोजन दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात करण्यात आल आहे.दापोली शहर व आजूबाजूच्या परिसरातील असलेल्या महिलांच्या मैत्री ग्रुपचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. मानकरी ठरलेल्या या मैत्री ग्रुपच्या महिलांनी दापोली शहराचे दैवत असलेल्या बाजारपेठेतील श्री पंचमुखी महारुद्र हनुमानाच्या मंदिरात जाऊन मारुतीरायाचे आशीर्वाद घेतले. यावेळी बाजारपेठ परिसरात या मैत्री ग्रुपचे बाजारपेठेतील ज्येष्ठ व्यापारी मनोज मेहता यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत परिसरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गृहराज्यमंत्री योगेश कदम व त्यांच्या पत्नी श्रेया कदम यांच्या शिवसेना महिला आघाडी कडून या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेबद्दल दापोली तालुक्यातील महिला वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.











