दापोली प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील दाभोळ येथे ग्रामपंचायत पुढाकाराने ओपन जिमचे उद्घाटन करून त्याचे लोकार्पण झाल्याने ग्रामस्थ व युवा वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे . तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या दाभोळ गावात ग्रामपंचायतीने पुढाकार घेत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला ओपन जिम हा उपक्रम सुरू केला आहे. ग्रामपंचायतीने 15 वा वित्त आयोग फंडामधून ओपन जिमचे उद्घाटन सोहळा दाभोळ ग्रामपंचायत सरपंच राखी तोडणकर व विलास काका जोशीयांच्या हस्ते हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सरपंच राखी तोडकर यांनी ओपन जिम हे दाभोळ गंगासागर तलावाजवळ या मध्यवर्ती ठिकाणी असून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी येऊन आपल्या उत्तम आरोग्यासाठी शरीर सदृढतेसाठी या जिमचा उपयोग करावा व आपलं उत्तम आर्युआरोग्य जोपासावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जिम साहित्य बसवण्यात आलेले आहेत.ग्रामस्थांनी याचा वापर करून आपला आर्युआरोग्य उत्तम ठेवावे सुदृढ आयुष्य आरोग्यासाठी ग्रामसभेचा उपयोग करतील अशा अपेक्षा सरपंच राखी तोडणकर यांनी प्रतिपादित केली. या उद्घाटन सोहळ्यास दाभोळ गावचे उपसरपंच अभय गोयथळे, माजी सरपंच संगीता दाभोळकर, ग्रामपंचायत सदस्य समित भाटकर ग्रामपंचायत सदस्य शंकर मुरमुरे ,भाजपा तालुका सरचिटणीस योगेश सुर्वे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तांबट, जीवन मयेकर,राजू लखांबे,समीर शेटे, दिलीप मुरकर, नजर बामणे, सुरेश दाभोळकर,पोलीस पाटील विनायक कुडाळकर, महेंद्र खेडेकर,फईम बामणे, साई मयेकर,पंकज खडपकर, दाभोळ मधील ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका या कार्यक्रमास उपस्थित होते. दाभोळ ग्रामपंचायतच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या ओपन जिमला ग्रामस्थ युवा वर्ग महिला यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.










