नगरपंचायत प्रशासन ॲक्शन मोडवर
दापोली प्रतिनिधी
दापोली शहरात नगरपंचायतीत प्लास्टिक वापराविरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे. दापोलीचे नूतन मुख्याधिकारी महेश धुमाळ यांनी आपल्या पदाची सूत्र हाती घेताच अवैध प्लास्टिक पिशव्यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. ही कारवाई तीव्र केली असून स्वच्छता मोहीमच त्यांनी शहर परिसरात हाती घेतली आहे. त्यामुळे परिसरात प्लास्टिकचा अवैध वापर करणाऱ्यांचे दहावे दणलेले आहे अवैधरित्या प्लास्टिक आढळल्यास थेट आर्थिक दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दापोली नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या कारवाईच निसर्गप्रेमी व पर्यावरण प्रेमींकडुन स्वागत करण्यात येत आहे. शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी प्लास्टिक पिशवी वापराविरोधात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली होती. त्यानंतर हा विषय मागे पडला होता मात्र आता या प्लास्टिक पिशव्या बनवणाऱ्या कंपन्यां विरोधातच शासनाने थेट कारवाई करावी अशी मागणी व्यापारी व ग्राहक वर्गाकडून केली जात आहे जेणेकरू
दिनांक १७ ऑगस्ट २०२६: *पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि प्लॅस्टिकमुक्त दापोलीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत दापोली नगरपंचायतीने शहरात प्लॅस्टिक कॅरी बॅगविरोधात धडक मोहीम राबवली आहे*.
या कारवाईमुळे प्लॅस्टिकच्या बेकायदेशीर वापरकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत. दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा शशांक घाग आणि मुख्याधिकारी महेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेदरम्यान दापोली शहरातील विविध दुकानांवर आणि आस्थापनांवर छापे टाकून अंदाजे १५ ते २० किलो प्लॅस्टिक कॅरी बॅग्ज जप्त करण्यात आल्या. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण १०,०००/- (दहा हजार रुपये) इतका दंड तत्काळ वसूल करण्यात आला.
या कारवाईच्या माध्यमातून नगरपंचायतीतर्फे सर्व शहरवासीयांना व व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात प्लॅस्टिक कॅरी बॅगचा वापर पूर्णपणे टाळावा. यापुढे कोणत्याही दुकानात किंवा व्यक्तीकडे प्लॅस्टिक कॅरी बॅगची विक्री करताना अथवा वापर करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर व कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी या नियमाचे पालन करून सहकार्य करावे, अशी नोंद घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा शशांक घाग आणि मुख्याधिकारी महेश धुमाळ यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात नगरपंचायतीचे कर्मचारी रिलेश गुरव,शितल शेठ, अरुण मोहिते, सुनिल टांक, शशिकांत रहाटे, संदिप डिंगणकर,मंगेश जाधव, वैभव कुमटेकर. अनिकेत सिंनगारे आणि सुधीर जाधव यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.








