मंडणगड(प्रतिनिधी) कर्तव्यदक्ष, युवा आणि कार्यतत्पर मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी तहसीलदार अक्षय ढाकणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मंडणगड तालुक्यात प्रशासकीय कामकाजात कार्यतत्परतेने योगदान देणारे तहसीलदार अक्षय ढाकणे यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध प्रशासकीय कामांना गती मिळत असून, नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी उपस्थित होते. तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्या पुढील प्रशासकीय व सामाजिक वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, यश, कीर्ती आणि समृद्धीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.








