भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार; सामाजिक व कायदेविषयक कार्याचे कौतुक
मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मिलिंद लोखंडे यांना वाढदिवसानिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. लोखंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभिजीत देवळेकर म्हणाले, “न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे तसेच गरजू घटकांना कायदेविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, ही महत्त्वाची सामाजिक सेवा आहे. ॲड. मिलिंद लोखंडे यांचे या क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असून, त्यांच्या कायदेविषयक अनुभवाचा सर्वसामान्यांना निश्चितच लाभ होत आहे.”








