मंडणगड (प्रतिनिधी) : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून भाजप अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे पंच विजय जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल यावेळी त्यांचे कौतुक व गौरव करण्यात आला.
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे, कबड्डी या पारंपरिक खेळाच्या विकासासाठी योगदान देणे तसेच पंच म्हणून जबाबदारी पार पाडत क्रीडा क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल विजय जाधव यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते विजय जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी अनुराज कांबळे, नकुश सावंत, सक्षम घाणेकर, आयुष घाणेकर, दिपेश सकपाळ,
क्रीडा विद्यार्थी उपस्थित होते.








