श्री. रविंद्र अंकुश धुरी, संपर्क ९४२०७८७२३९
माझ्या लेखाचा विषय आहे. मी अनुभव तुमच्या अद्भुत शक्तिचा चमत्कार आहे. तीला कोणी अनकॉनशियस अंतर्मन ब्रम्हांड (यूनीव्हर्स) असे देखील म्हणतात. तुम्हीच करा तुमच्या सर्व समस्येवर उपचार हो. तुम्हा प्रत्येकाकडे एक अद्भुत शक्ती
समस्या, रोग व इतरही रोग बरे करू शकता. श्रीमद्भगवतगीतेतदेखील श्रीकृष्णाने हो तुमच्याकडे सुप्तमनाची अद्भुत शक्ती आहे. त्याद्वारे तुम्ही तुमच्या सर्व सांगितले आहे की तुम्हीच तुमचे बंधु, सखा आहात व तुम्हीच तुमचे शत्रू आहात आता तुम्हीच ठरवायचे आहे की तुम्ही काय व्हायचे
मानशास्त्र सांगते की रोग तुम्हाला हवे असतात म्हणून होतात. तुम्हाला कठीण परिस्थिती किंवा इतर कोणतीही समस्या तुम्हाला हवी असते म्हणून येते. स्वामी विवेकानंद, गौतम बुध्द असे म्हणतात मी तुम्हाला होणा-या रोगाला किंवा संकटाला तम्हीच जबाबदार असता.
आता त्यासाठी काय करायचे? हा तुमचा प्रश्न संयुक्तिक आहे. काही नाही फक्त रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनीटे व सकाळी उठल्यावर ५ मिनीटे स्वतःला सूचना दयायची. रात्री झोपताना फक्त मन एकाग्र करून आपली जी काही समस्या अगर रोग असेल तो संपला असे म्हणून देवाचे व सुप्तमनाचे आभार मानायचे. कधीही मागणी करू नका. कल्पना करा तुमची समस्या संपली, रोग बरा झाला असे चित्र रंगवा. तुम्हाला हे ३ महिने करायचे आहे. त्यानंतर चमत्कार पहा. तुम्ही कधीही शंका बाळगू नका. अंर्तमनावर सुप्तशक्तीवर विश्वास ठेवा. तुम्हाला प्रत्यय येतो की नाही पहा.
आज मला डायबिटीस (मधुमेह) हा एक लोकप्रिय आजार सर्वत्र मनाने ओढवून घेतलेल्या रोगापैकी एक आहे. आणखी रक्तदाब वगैरे रोग आहेत. मला रोगांची नावे माहित नाहीत. कारण मला कुठलाही रोग नाही व मी रोगाची माहिती लक्षणे बघतदेखील नाही व ऐकतदेखील नाही. रोगाचे लक्षण ऐकून किंवा वाचून रोग होणारे खूप आहेत. तसेच इतरांची समस्या व कठीण परिस्थिती पाहून हे आपल्याला आले तर? या भितीनेही परिस्थिती किंवा रोग आपल्याकडे आकर्षित करणारे आहेत.
मी तुम्हाला एवढे निश्चित सांगतो की जर तुम्ही ठरवले तर रोग बरे करू शकता किंवा कठीण परिस्थितीतून, समस्येतून सुटका करून घेवू शकता. एवढेच नव्हे तर पैश्याचा प्रश्न सोडवू शकता. कॅन्सर वगैरे सारख्या असाध्य रोगातून सुध्दा करून घेवू शकता.
अंतर्मन (सुप्तशक्ति) हे दिव्यशक्तीचे केंद्र आहे. जसा तुम्ही विचार कराल तसे ते देते. तुम्ही सकारात्मक विचार कराल तर तुम्हाला तसे प्राप्त होईल. तुम्ही नकारात्मक विचार कराल तर तुम्हाला तसे प्राप्त होईल. सुप्तमन तुम्ही सांगाल तसे करते. ते कोणतेही प्रश्न विचारत नाही. निमूटपणे ते काम करते.
आता सुप्तमन काय कसे करते ते खालीलप्रमाणे-
“यु कैन हील युवर माईंड” ची लेखिका नाव नाही आठवत. तिला कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी तिला ऑपरेशनचा सल्ला दिला होता. तीने पैश्याचे कारण सांगून ३ महिन्याचा अवधी घेतला व तीने सुप्तमनाच्या शक्तीने रोग बरा केला. ती जेव्हा डॉक्टरकडे गेली व डॉक्टरांनी तीला तपासले त्यावेळी कॅन्सर नाहीसा झालेला होता. डॉक्टर चकीत झाले.
दुसरे उदाहरण म्हणजे एकाचा कार अॅक्सिडेंट झाला तो मोडून पडला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तू कधीही उभा राहू शकणार नाहीस असे सांगितले. पण तो सुप्तमनाच्या शक्तीवर पुन्हा उभा राहिला व तो डॉक्टरांना भेटला. डॉक्टर आश्चर्यचकित झाले.
आणखी एक उदाहरण देतो. त्यासाठी काल्पनीक नांवे घेवू या. अर्जुन याला एक मुलगी होती. तीचे नांव शैला ती परदेशात होती. तीला आपल्या बापावर खूप विश्वास होता. तेथे तीला एक रोग झाला. त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये होती. तीने आपल्या वडिलांना फोनद्वारे कळविले व तुम्हीच मला बरे करू शकता. काहीतरी करा असे सांगितले. त्याप्रमाणे अर्जुनने आपल्या सुप्तमनात आपली मुलगी शैला बरी झाली आहे व ती भारतात आपल्याला भेटायला आली असे मनात चित्र रंगविले आणि काय आश्चर्य खरोखर ती भारतात येवून आपल्या वडिलांना भेटली. हा चमत्कार सुप्तमनाचा जाणून घ्या.
म्हणूनच म्हणतो जे पिंडी ते ब्रम्हांडी असे आपले साधुसंत म्हणतात ते खोटे नाही. आपल्या मनात सर्व प्रकारचे डॉक्टर्स, इंजिनिअर, प्लंबर वगैरे सर्व काही आहे.
म्हणून म्हणतो खा, प्या, मजेत आनंदात रहा. नेहमी हसतमुख रहा. जे मनाला पटेल व आवडेल ते करा. जास्त विचार करीत बसू नका. मग कोणताही रोग किंवा संकटे तुमच्याकडे येण्याचे धाडस करणार नाहीत. हे पक्के लक्षात ठेवा.
जाता जाता पुन्हा सांगतो की, कोणतीही समस्या किंवा रोग असू द्या. कधीही काही मागू नका. तुमची रोगापासून सुटका झाली किंवा संकटमुक्त झालात असे प्रत्येकवेळी चित्र रंगवा व दरवेळी ईश्वराचे व सुप्तमनाचे आभार मानायला चुकू नका. आनंदी रहा, सुखी रहा असे म्हणून हा लेख इथेच थांबवितो.









