नगरसेविका साधना बोत्रे यांचा पुढाकार
दापोली (प्रतिनिधी) – आत्मविश्वास वाढवूया, व्यवसाय यशस्वी घडवूया या संकल्पनेतून वूमन्स इरा फाऊंडेशन आणि नगरसेविका मा. सौ साधना बाळासाहेब बोत्रे यांच्या संयुक्त विद्यमाने DSR शिलेदार टीम आयोजित स्किन आणि हेअर सिक्रेट प्रोग्राम बुधवार दि. २ सप्टेंबर रोजी दापोली येथील फाटक कॅपिटल हॉलमध्ये उत्साहात पार पडला.
या विनामूल्य कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक महिला व युवतींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वृषाली शेडगे यांनी उपस्थित महिलांना त्वचा आणि केसांच्या निगेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात हर्बल पोटली फ्रेशियल, हायड्रा बुस्ट क्वीन अप, एन्टागलो व डी टॅन क्लीन अप, पार्टी ग्लो क्लीन अप, प्रोटीन हेअर मास्क, हेअर पोषण व सिरम ॲप्लिकेशन, बाथ बॉम्ब, बायो मॅग्नेटिक ब्रेसलेट असे १० प्रकारचे लाईव्ह डेमो दाखवण्यात आले.
यावेळी कंपनीचे प्रॉडक्ट प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच १५ लकी ड्रॉ कुपन काढण्यात आले व सहभागी झालेल्या प्रत्येक ब्युटीशियनचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिया नागवेकर, आस्था नागवेकर, वैदेही पवार, सुप्रिया जाधव, मानसी यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.










