क्रिस्टल कंपनीचा उपक्रम
दापोली प्रतिनिधी
कोकणातील सर्वात मोठ्या आणि उत्साहाच्या सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या दापोली बस स्थानक सज्ज होत आहे. दापोली मध्ये एकूण 12 कर्मचारी 7 कर्मचारी बस स्वच्छता, 2 कर्मचारी सुलभ शौचालय आणि 3 कर्मचारी सफाई यांच्याकडून ही स्वच्छता मोहीम सुरू आहे. या सगळ्या स्वच्छता मोहिमेवर दापोली आगाराच्या व्यवस्थापक डेपो श्रीमती प्रभुणे, दापोली आगाराचे मुनाफ राजापकार व व स्वच्छता मोहिमेच्या क्रिस्टल कंपनीचे सुपरवाईजर विनोद महाडिक यांच्या देखरेखीखाली हा स्वच्छता उपक्रम सुरू आहे. या स्वच्छता उपक्रमामुळे प्रवासी वर्ग व कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे
परिवहन मंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या स्वच्छता व्यवस्थेमध्ये विशेष लक्ष दिले जात असून, अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्रीचा वापर करून बसस्थानके अधिक स्वच्छ आणि आकर्षक करण्यात येत आहेत.
बसस्थानक परिसरातील दैनंदिन स्वच्छता, ओल्या व कोरड्या पद्धतीने साफसफाई, शौचालयांची नियमित स्वच्छता, प्लॅटफॉर्म परिसराची देखभाल तसेच प्रवाशांच्या प्रतीक्षालयांची देखील स्वच्छता होणार आहे. परिवहन मंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या स्वच्छता व्यवस्थेमध्ये विशेष लक्ष दिले जात असून, अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्रीचा वापर करून बसस्थानके अधिक स्वच्छ आणि आकर्षक करण्यात येत आहेत.
बसस्थानक परिसरातील दैनंदिन स्वच्छता, ओल्या व कोरड्या पद्धतीने साफसफाई, शौचालयांची नियमित स्वच्छता, प्लॅटफॉर्म परिसराची देखभाल तसेच प्रवाशांच्या प्रतीक्षालयांची स्वच्छता यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर एसटी बसेसचीही नियमित स्वच्छता करण्यात येत असून, प्रवाशांच्या सेवेसाठी बसेस चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.









