भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचा सामाजिक उपक्रम!
मंडणगड (प्रतिनिधी) :
समाजातील सर्वसामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे आणि आपल्या कार्यातून जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते ॲड. वैभव खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने कर्णबधिर व्यक्तींना मोफत श्रवणयंत्रांचे वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
राजकारणापलीकडे जाऊन माणुसकीचे नाते जपणारे नेतृत्व म्हणजे ॲड. वैभव खेडेकर! तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते समाजातील वंचित, उपेक्षित आणि अनुसूचित जातीतील बांधवांपर्यंत प्रत्येकाच्या प्रश्नांची जाण ठेवून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. कोणताही भेदभाव न करता अडचणीत सापडलेल्या माणसाच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची कार्यपद्धती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आपत्तीचा काळ असो, अपघाताची घटना असो किंवा कोरोना महामारीसारखे संकट असो, अशा कठीण प्रसंगी मदतीचा हात घेऊन धावून जाणाऱ्या नेतृत्वांमध्ये ॲड. वैभव खेडेकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. संकटाच्या काळात केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढाकार घेण्याची त्यांची भूमिका सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.
विशेषतः तरुणांसाठी ते प्रेरणास्थान असून, सामाजिक कार्याची आवड, जनतेशी असलेली नाळ आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची वृत्ती यामुळे त्यांनी जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनुसूचित जातीतील बांधवांच्या समस्या, त्यांच्या अडचणी आणि हक्कांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.
सहकाऱ्यांना समानतेची वागणूक आणि कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभाग हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य! आपल्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याला समानतेची वागणूक देत सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती विशेष उल्लेखनीय आहे. पदाचा किंवा प्रतिष्ठेचा कोणताही मोठेपणा न बाळगता प्रत्येक कार्यकर्त्याला आपलेपणाची जाणीव करून देणे, कार्यकर्त्याचे दुःख आपले दुःख समजून त्याच्या अडचणीच्या काळात धावून जाणे आणि आनंदाच्या क्षणीही त्याच्या पाठीशी उभे राहणे, ही त्यांची कार्यशैली आहे. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देणारे आणि केवळ राजकीय संबंध न ठेवता कुटुंबातील सदस्याप्रमाणे जिव्हाळ्याचे नाते जपणारे नेतृत्व म्हणून ॲड. वैभव खेडेकर यांच्याकडे पाहिले जाते. सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांना काम करण्याची संधी देणे आणि प्रत्येकाच्या योगदानाचा आदर करणे, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाची बाजू आहे.
त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने कर्णबधिर बांधवांना मोफत श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. अडखळ, पाले, सडे, वडवली, मंडणगड यांसह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गावांमधील गरजू लाभार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यात येणार आहे.
श्रवणदोषामुळे अनेकांना दैनंदिन जीवनात संवाद साधताना, शिक्षण घेताना तसेच सामाजिक जीवनात सहभागी होताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तींना श्रवणयंत्रांच्या माध्यमातून संवादाचे नवे दालन खुले व्हावे, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या सामाजिक उपक्रमाची माहिती भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते आणि जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांनी दिली.
वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा सोहळा नव्हे, तर आपल्या आनंदात समाजातील गरजू व्यक्तींनाही सहभागी करून घेण्याची संधी! या भावनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा ठरणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू कर्णबधिर बांधवांच्या जीवनात श्रवणयंत्रांच्या माध्यमातून संवादाचा नवा प्रकाश निर्माण करण्याचा हा प्रयत्न निश्चितच समाजोपयोगी आहे.








