दापोली प्रतिनिधी
रामराजे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स दापोली मधील विद्यार्थिनींनी कै.मेजर नारायणराव कदम कला, वाणिज्य ज्युनियर कॉलेज फणसू आणि मा. श्र प्रकाशजी पेठे साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केले.यामध्ये महाविद्यालयीन गटात कुमारी यशस्वी संदीप मोरे बारावी कला प्रथम तर कुमारी दीक्षा समीर जाधव बारावी कला हिने तृतीय क्रमांक मिळवला.
यशस्वी विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक संदीप राजपुरे, संस्थेच्या अध्यक्षा स्मिताली राजपुरे, रामराजे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक निर्बाण, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक हर्डीकर, संस्थेचे संचालक दिनेश जैन, चेतन जैन, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वेदिका राणे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.








