मंडणगड येथील अभिजीत देवळेकर यांचा उपक्रम
मंडणगड(प्रतिनिधी) महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे.भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ,उत्तर रत्नागिरी आयोजित जनसेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत त्यांनी मंडणगड तालुक्यातील देव्हारे पंचक्रोशी हायस्कूलमधील ६ हुशार व गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
अभिजीत देवळेकर यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व शैक्षणिक साहित्याचा संपूर्ण खर्च आता उचलला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला असून, या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देतात. त्यांच्या याच जनकल्याणकारी विचारांमधून प्रेरणा घेऊन हा शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आल्याचे अभिजीत देवळेकर यांनी सांगितले.देवळेकर यांच्या या सामाजिक बांधिलकीचे व शैक्षणिक क्षेत्रातील या मदतीचे स्थानिक नागरिकांसह पालकांमधून आणि शिक्षकांकडून उत्स्फूर्तपणे कौतुक केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून या उपक्रमाचे सार्थक झाल्याची भावना व्यक्त होत असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून देवळेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमाला भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मंगेश मोहिते, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र कापसे,भाजपा चिपळूण तालुका अध्यक्ष उदय घाग,चिपळूण तालुका महिला मोर्चा वैष्णवी राजेशिर्के, जिल्हा निमंत्रक समिती सदस्य गणपत गावकर,जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश घाग,दीपक गुरव,कृषि मित्र दीपक मोहिते,
प्राध्यापक विष्णु बडे, कुंडलिक यादव,अमित रसाळ ,प्रशांत उगले,चांदणी शिगवण, रोशनी साखरकर,वैभव पाध्ये,योगेश कुमार केसरे ,दत्तात्रय कदम सह विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमित रसाळ यांनी मानले.







