विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
दापोली प्रतिनिधी
सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी प्रतिनिधींचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेचे चेअरमन सुजय मेहता आणि शाळेच्या मुख्याध्यापिका रितू मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत स्कूल मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध पदांची जबाबदारी प्रदान करण्यात आली.
समारंभाच्या प्रारंभी चेअरमन श्री. सुजय मेहता सर यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व, शिस्त आणि जबाबदारी यांचे महत्त्व पटवून देत नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका सौ.रितू मेहता मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करून शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.
यावेळी हेड बॉय म्हणून विद्यार्थी श्रियांस मेहता आणि हेड गर्ल म्हणून विद्यार्थिनी अनुष्का भैसारे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच डेप्युटी हेड बॉय म्हणून कु. फरहान शेख व डेप्युटी हेड गर्ल म्हणून कु. श्रुष्टी हेदूकर यांना पदभार सोपविण्यात आला.
स्पोर्ट्स कॅप्टन म्हणून विद्यार्थी अभिषेक यादव व कु. स्वरा तुपे, डिसिप्लिन लीडर्स म्हणून कु.सर्वेश शिंदे व कु. स्वरा चव्हाण तसेच कल्चरल हेड्स म्हणून प्रज्वल घुले व मुग्धा चव्हाण यांची निवड करण्यात आली.
तसेच विविध हाऊसचे कॅप्टन म्हणून आकाश हाऊसचे अस्मी कदम व आदि मुरुडकर, अग्नी हाऊसचे लक्षिता सुंदेशा व आगम जैन, पृथ्वी हाऊसचे अदिती सावंत व वरद गुजर तसेच त्रिशूल हाऊसचे स्वेच्छा सागवेकर व देव पटेल या विद्यार्थी व विद्यार्थिनींची यांची नियुक्ती करण्यात आली.
नवीन पदाधिकाऱ्यांनी शाळेची शिस्त, गुणवत्ता आणि प्रतिष्ठा जपण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित करण्याच्या दृष्टीने हा पदग्रहण समारंभ अत्यंत प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे चेअरमन सुजय मेहता, मुख्याध्यापिका रितू मेहता , शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.








