चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली गावातील प्रगतशिल शेतकरी राजेंद्र धाकटू गावकर यांनी नाचणी पिक स्पधेमधे जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. नाचणी हे कोकणातील पारंपारिक शेती पीक आहे नाचणी लागवड स्पर्धेत त्यांनी मिळवलेल्या या मोठ्या यशाबद्दल त्यांचा चिपळूण भाजपा (पश्चीम ) वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. या कौतुक कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष उदय घाग भाजपा अनुचित मोर्चा जिल्हाअध्यक्ष मंगेश मोहिते, महीला मोर्चा अध्यक्षा वैषावी शिर्के, जिल्हा निमंत्रक समिती सदस्य गणपत गावकर, जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश घाग कृष्णा मोहिते ,अशोक मोहिते, गणपत राणाम, सचिन गावकर,सरोज राणीम, वसंत दुगवली व ग्रामस्थ उपस्थित होते . त्याच प्रमाणे विजेते शेतकरी राजेंद्र गावकर यांचे चिरंजिव मानस गावकर यानी नाचणी झोडण्याचे नविन तंत्र स्वःता तयार करून ते यशस्वी करून दाखविले व त्या यंत्रामुळे अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. मानस यांचाही यावेळी गौरव करण्यात आला
या छोटेखान
कार्यक्रमात भाजपा अनुसुचित मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते यानी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शेती व्यवसाय काही काळ अडचणीत सापडल्याने संपुष्टात येण्याची भिती निर्माण झाली होती . मात्र शेती व बागायतदार यांच्या अर्थव्यवस्थेला सरकारने नवीन गती दिली असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकरी बागायत यांनी घेणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक ते सहकार्य लागेल ती माहिती आमच्याकडून देण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी व शेतीकडे वळण्याचा ओढा वाढवा कोकणातील शेती क्षेत्राला पुन्हा उभारी मिळावी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याना शेती विषयक योग्य ते मार्गदर्शन करावे जेणेकरून नव्या पिढीला शेती बागायतीची आवड कशी निर्माण होईल तसेच शेतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या सगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी चांगले काम करत आहेत त्यांचेही मोहिते यांनी यावेळी कौतुक केले. राजेंद्र गावकर यांच्या शेतीच्या यशोगाथेच कौतुक यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केल. शेती व्यवसायातील माहिती तेवढ्यासाठी शेतकऱ्यांच्याजवळ आपल्यासह सगळ्यांचाच संवाद महत्त्वाचा आहे जेणेकरून आपल्यालाही शेती बागायतीची आवड निर्माण होईल असे मत यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष उदय घाग यांनी व्यक्त केलं







