सिंधुदुर्ग जिल्हा रोटरी क्लब पदाधिकाऱ्यांचा पुढाकार
सिंधुदुर्ग
रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल च्या वतीने व IPDG रोटरी क्लबचे अरुण भंडारे यांनी दिलेल्या जिल्हा सहाय्यच मदत निधीतून मधून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे त्यांना सहज शाळेत जाता यावे यासाठी सायकलिंगचे वाटप करण्यात आल आहे. विद्यार्थिनींना शाळेत व क्लासला सहज जाता यावे त्यांनी याबाबती त्यांना शाळेत व क्लासला जाण्यासाठी कोणावर अवलंबून रहावे लागे नये तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश मिळावा त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात मदत व्हावी या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तब्बल 20 सायकलींचे वाटप विद्यार्थिनींना करण्यात आले.रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक आळवे , डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली,चार्टर प्रेसिडेंट डॉ.प्रशांत कोलते,कुडाळ रोटरी क्लब चे अध्यक्ष मकरंद नाईक, सेक्रेटरी म्हाडदळकर,IPP रो. राजीव पवार, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे ललित वंजारे,व्यंकटेश घोगळे,गौरव घोगळे,विवेक राणे, अरुण मालणकर, ओसरगांवचे उपसरपंच गुरुदास सावंत, ग्रामपंचायत सदस्या वंदना पारकर,सामाजिक कार्यकर्ते बबली राणे व ग्रामस्थ तसेच लाभार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते. रोटरी क्लबच्या पुढाकाराने विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या सायकल मुळे त्यांचा प्रवास सुख घडवणार आहे त्यामुळे यावेळी विद्यार्थिनी कडून आनंद व समाधान व्यक्त होत तर पालक वर्गाकडूनही या सामाजिक कार्याबद्दल समाधान व कौतुक व्यक्त होत आहे










