मंडणगड(प्रतिनिधी)मंडणगड तालुक्यातील देव्हारे कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर व महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र कापसे यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र कापसे होते.
या कार्यक्रमात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की,देव्हारे कनिष्ठ महाविद्यालय गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे काम करत असून येथील विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच क्रीडा, कला, वक्तृत्व आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये महाविद्यालय संधी देत आहे. महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापक विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र कापसे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, कॉलेज जीवन हे केवळ पुस्तकी ज्ञान मिळवण्याचे ठिकाण नाही. हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याचा काळ आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्याची मोठी संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर,महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र कापसे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पंच विजय जाधव,शाळा विकास समिती अध्यक्ष सुरेश तांबे, सदस्य उमेश घागरूम, प्राध्यापक कुंडलिक यादव,अमित रसाळ ,प्रशांत उगले,चांदणी शिगवण, रोशनी साखरकर,वैभव पाध्ये,योगेश कुमार केसरे ,दत्तात्रय कदम सह विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
यावेळी प्राध्यापक अमित रसाळ, वैभव पाध्ये, योगेश कुमार केसरे यांनी विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य शाखांच्या भविष्यातील विविध संधींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील ग्रंथालय,आणि इतर सुविधांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पाध्ये आणि आभार अमित रसाळ यांनी मानले.








