वृक्ष लागवड करून दिला दादांच्या स्मृतींना उजाळा
दापोली प्रतिनिधी
महाराष्ट्राचे वटवृक्ष म्हणून अजितदादांना आज ओळखले जाते आणि याच महाराष्ट्राच्या वटवृक्षासाठी त्यांची आठवण म्हणून त्यांच्या स्मृती या वटवृक्षाच्या माध्यमातून चिरंतर रहाव्यात म्हणून आपण माजी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जन्मदिनाच औचित्य साधून वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका साधना बोत्रे यांनी दिली. दापोली शहरातील काळकाईकोंड येथील लोकमान्य शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. एक झाड महाराष्ट्राच्या वटवृक्षासाठी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दापोली शहरातील काळकाई कोंड येथील लोकमान्य हायस्कूल या शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वड तसेच अशोकाची रोपे लावण्यात आली. या कार्यक्रमानिमित्ताने अजितदादांची प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली. यावेळी महिला तालुकाध्यक्ष व दापोलीच्या माजी नगराध्यक्षा विनिता शिगवण, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी प्रीती जैन, भाग्यश्री फणसळकर,वैदेही महाडिक, मुख्याध्यापिका श्रीमती राऊत, भाटकर, शिक्षक अरविंद वानखेडे आदी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना अजितदादांच्या कार्यप्रणालीचे शिस्तप्रियतेचे स्वच्छतेचे आणि कामाप्रती प्रामाणिक राहणे अशा अनेक स्मृतींना उजाळा दिला










