सोवेली, दापोली
कृषि महाविद्यालय,दापोली येथे चतुर्थ वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दापोली तालुक्यातील सोवेली गावात महाराष्ट्र राज्य गोमाता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांची जंयती साजरी करण्यात आली.
आज दिनांक २२/०७/२०२६ रोजी सोवेली गावात श्री.प्रल्हाद यादव यांच्या गाईचे पुजन करून महाराष्ट्र राज्य गोमाता दिनाची सुरुवात करण्यात आली. गाईंना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देण्यात आला.यावेळी प्रल्हाद यादव यांनी गोमातेचे वैदयकिय फायदे व गावठी गाईचे महत्व पटवुन सांगितले. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन केलेल्या “कोकण कपिला” या गाईचे महत्व मृद्धगंध गटाने सर्व शेतकऱ्यांना सांगितले. कोकण कपिलेचे वैशिष्टय़, दूध उत्पदन क्षमता ,रोग प्रतिकार शक्ती ,जीवनकाळ या सर्वांची माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये गोमाते विषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने जिल्हा परिषद मराठी शाळा सोवेली नं. १ येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये शाळेतील मुलांना गायचे चित्र रंगवण्याची स्पर्धा घेण्यात आली तसेच महाराट्रातील खिल्लार , लाल कंधारी, डांगी , कोकण कपिला, देवणी,यांसारख्या विविध गायींची माहिती देण्यात आली. स्पर्धेच्या विजेत्यांचे कौतुक करून या महाराष्ट्र राज्य गोमाता दिनाची सांगता करण्यात आली.
सदरची कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजयकुमार देसाई, विषय विशेष तज्ञ डॉ.नरेंद्र प्रसादे व कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.











