हर्णै समुद्र किनाऱ्यावर घोस्ट नेट हटाव मोहीम; ११५ किलो टाकाऊ फिशिंग नेट्स हटवून सागरी जीवांना दिला दिलासा
दापोली तालुक्यातील हर्णै येथे समुद्र किनारपट्टी परिसरात २५ जुलै २०२६ रोजी जागतिक कांदळवन दिन (World Mangrove Day) निमित्त अत्यंत महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला
JNK Marine Aqua Life, हर्णे, Ratnagiri Ornamental Fish Farmer Trust, Wild Animal Rescue Trust, दापोली आणि Seva Charitable Trust, हर्णे यांच्या संयुक्त विद्यमाने हर्णे समुद्र किनाऱ्यावरील खडकांमध्ये अडकलेल्या Ghost Nets (टाकाऊ फिशिंग जाळे) काढण्यासाठी स्वच्छता व बचाव मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली.हर्णैदापोली तालुक्यातील हर्णै येथे २५ जुलै २०२६ रोजी जागतिक कांदळवन दिन (World Mangrove Day) निमित्त JNK Marine Aqua Life, हर्णे, Ratnagiri Ornamental Fish Farmer Trust, Wild Animal Rescue Trust, दापोली आणि Seva Charitable Trust, हर्णे यांच्या संयुक्त विद्यमाने हर्णे समुद्र किनाऱ्यावरील खडकांमध्ये अडकलेल्या Ghost Nets (टाकाऊ फिशिंग जाळे) काढण्यासाठी स्वच्छता व बचाव मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली.
या मोहिमेत समुद्री कासव, मासे, खेकडे, प्रवाळ तसेच इतर सागरी जीवांसाठी धोकादायक ठरत असलेले सुमारे ११५ किलो खराब व टाकाऊ फिशिंग नेट्स समुद्र किनाऱ्यावरील खडकांमधून काढून सुरक्षितरीत्या विल्हेवाटीसाठी जमा करण्यात आले.
या उपक्रमास Wild Animal Rescue Trust, दापोलीचे सचिव तुषार महाडिक व त्यांची टीम, दापोली वनविभाग वनरक्षक प्रभू साबणे, विश्वंभर झाडे, शुभांगी गुरव, Seva Charitable Trust, हर्णेच्या अध्यक्षा सना काझी, उपाध्यक्षा सारिखा पवार, Ratnagiri Ornamental Fish Farmer Trustचे अध्यक्ष फहाद जमादार, तसेच ग्रामपंचायत हर्णेचे कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी सागरी जैवविविधतेचे संरक्षण, समुद्री प्रदूषण रोखणे आणि किनारपट्टी स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी भविष्यातही अशा पर्यावरणपूरक मोहिमा नियमितपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
या यशस्वी उपक्रमामुळे हर्णे समुद्र किनाऱ्यावरील सागरी परिसंस्थेच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे योगदान मिळाले असून स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेचे स्वागत केले.











