दापोली:- सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने आसूद ग्रामस्थ कार्य मंडळाच्या वतीने रविवारी उद्या दिनांक 27 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० या वेळेत आई झोलाई मंदिर, आसूद, दापोली येथे होणार असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्याच्या रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाला नवजीवन मिळू शकते. त्यामुळे समाजाप्रती आपले कर्तव्य म्हणून प्रत्येक सक्षम नागरिकाने रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदानासाठी येणाऱ्या इच्छुकांनी पूर्वनियोजनासाठी किरण बांद्रे यांच्याशी ९४०५८०८६६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी सांगितले आहे.
या रक्तदान शिबिराचे आयोजन आसूद ग्रामस्थ कार्य मंडळ, आसूद यांच्या वतीने करण्यात आले असून, परिसरातील युवक, महिला, सामाजिक संस्था तसेच सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान – आपल्या एका रक्तदानाने एखाद्याला नवजीवन मिळू शकते.” या संदेशाला प्रतिसाद देत जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








