दापोली प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने २६३ दापोली विधानसभा मतदारसंघासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील सर विश्वेश्वरैय्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराला उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गृह (शहरे), महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच खासदार सुनील तटकरे व नारायण राणे, विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, किरण सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, विविध पंचायत समित्यांचे सभापती, खेड, दापोली व मंडणगड येथील नगराध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध महसूल सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, दापोली तालुका तहसीलदार अर्चना बोंबे यांनी केले असून तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली दापोली तालुका महसूल विभागाकडून या शिबिरासेवेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे








